लाफाएत, मार्की द
लाफाएत, मार्की द : (६ सप्टेंबर १७५७ – २० मे १८३४). फ्रेंच सेनानी, मुत्सद्दी आणि राजकीय नेता. त्याचे पूर्ण नाव झोझेफ पॉल इव्ह रॉक झिल्बर द्यू मॉत्ये मार्की द लाफाएत. त्याचा जन्म लष्करी परंपरा असलेल्या सधन सरदार घराण्यात चाव्हेनियाक (हौत लॉयर) येथे झाला.